हरदोली/सिहोरा (Sihora Police) : तुमसर तालुक्यातील (Tumsar taluka) सोंड्या धरणात मासे पकडण्याकरिता गेलेल्या युवकाचा (Young Death) धरणातील पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ८ वा. सुमारास घडली. माहितीनुसार, राजेंद्र मोरेश्वर अंबाडारे वय 30 वर्षे, रा. वारपिंडकेपार, ता. तुमसर असे मृत युवकाचे नाव असून, तो आपल्या मित्रांसोबत सोंड्या येथील (Bavanthadi River) बावनथडी नदीवरील धरणात मासे पकडायला गेला. मासे पकडताना धरणात पाय घसरल्याने राजेंद्र आंबेडारे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती (Sihora Police) सिहोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Tumsar Hospital) शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे रवाना केले. दरम्यान फिर्यादी मोरेश्वर रामचंद्र आंबेडारे यांच्या तक्रारीवरून व पोलीस पंचनामा तसेच प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग सिहोरा पोलिसात (Sihora Police) दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मनोज ईळपाते करीत आहेत.