गोरेगाव/हिंगोली (Silver Price today) : सेनगाव तालुक्यातील (Sengaon Taluka) तपोवन येथे ११ जून रोजी बिहारमधील तीन सराईत भामट्यांनी चांदीचा ऐवज उजळून देण्याच्या नावाखाली तीन कुटुंबांतील २४ तोळे चांदी पाण्यात गाळुन पोबारा केला होता. परंतु फसवणूक झाल्याचे कळताच विशाल मते, पींटु मते यांनी त्या भामट्यांचा पाठलाग करून माझोड गावकर्यांच्या मदतीने पकडुन (Sengaon Police) पोलिसांच्या ताब्यात दिले.
सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील घटना
११ जून रोजी दुपारी १२ च्या सुमारास तपोवन गावात घडली. दुघाकीवर तीघा तरुण युवकांनी गावात पोहचताच (Sengaon Crime) तांब्या पितळीचे देव, भांडे आदी उजळुन देण्याचा प्रारंभी प्रयोग करून घरात माणसाची कमी हेरून स्वप्नील अजबराव मते यांच्या आजीच्या अंगावरील चांदीचा ऐवज उजळण्याची भुरळ घालुन चांदी पाण्यात गाळुन उर्वरीत ऐवज हवाली केला. विशाल भास्कर मते, शंकर तुळशीराम मते यांच्या घरी सुध्दा असाच प्रकार करून त्या भामट्यांनी पोबारा केला होता. शंकर मते, विशाल मते यांना ऐवजाचे वजन कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वप्नील मते यांना हकीकत कळवून विशाल मते यांनी पींटु मते यांना सोबत घेत दुचाकीने त्या भामट्यांचा पाठलाग केला. कडोळी गावातुन माझोड गावाकडे गेल्याचे कळताच पींटु मते यांनी माझोड गावात संदेश पोहचवताच तेथील गावकर्यांनी गावा बाहेरच रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली उडवी लाऊन त्या तीघा भामट्यांना थोपवले.
गोरेगाव पोलिसांच्या दिले तिघेजण ताब्यात
याप्रसंगी सपोनि रवींद्र हुंडेकर कामानिमित्त आले असता त्यांना (Sengaon Police) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच सदर गुन्हेगार बिहारचे असल्याचे समोर आले असून त्यांनी प्रात्यक्षिकाव्दारे धातु गाळण्याचे प्रयोग करून दाखविला. विविध केमीकल आदी साहित्य जप्त करण्यात आले. तपोवन गावातून २४ तोळे चांदीवर भामट्यांनी डाव मारल्याची शहनीशा झाल्याचे वृत्त आहे. यातील तिघांना ग्रामस्थांनी पकडून (Goregaon Police) गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. या हेराफेरीचे रॅकेट पार बिहार पर्यंत असल्याचे कळते. ११ जून रोजी सायंकाळी उशिरा पर्यंत कारवाईचा सोपस्कार सुरू होते.