परभणी/ताडकळस (Parbhani):- येथील ३३ के.व्ही उपकेंद्रा अंतर्गत गावातील शेतकरी(Farmers), विद्यार्थ्यांसह (Students) सर्वच नागरिक वीज समस्येंने वैतागले असुन तांत्रिक बिघाडाच्या(Technical failure) नावाखाली ऐन सण -उत्सवाच्या काळात देखील वीजपुरवठा खंडीत होतो तसेच विजेच्या लंपडावाने ग्रामस्थ वैतागले आहेत.
ग्राहकांनी वीजबिल भरा असे महावितरणचे आवाहन
येथुन जवळच असलेल्या सिरकळस येथे तब्बल चार महिन्यांपासून वीजबील थकबाकी असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे ग्रामस्थांना विजेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज ग्राहकांनी विज बिल भरणा करण्याचे आवाहन महावितरणच्या(Maha distribution) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. ताडकळस येथील ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत असलेल्या गावात सध्या महावितरणने पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत भारनियमन घेण्यात येत आहे. तसेच भारनियमना व्यतिरिक्त तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली तासान तास वीज पुरवठा खंडित होत आहे. गत काही दिवसांपासून पुर्णा येथील ३२ केव्ही अंतर्गत तांत्रिक बिघाडामुळे तब्बल १५ ते २० गावांचा वीज दिवसा व रात्री विज पुरवठा बंद होत आहे.
यावर्षी मुबलक पाऊस पडला नाही. यामुळे भर हिवाळ्यात देखील उन्हाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. तसेच अनेक सणात देखील अंधाराचे साम्राज्य पसरत आहेत.
सण -उत्सवाच्या काळात तरी वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी
यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असुन सण -उत्सवाच्या काळात तरी वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच बहुतांश गावातील अनेक ठिकाणी जीर्ण विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा झाल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे वारंवार वीज पुरवठा (Power supply)खंडित आहे. मौजे सिरकळस येथील वीज पुरवठा मार्च महिन्यात वीज बिल वसुली नसल्याने बंद केला आहे. तब्बल चार महिन्यांपासून येथील विजपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना विजेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे . ग्राहकांनी विजबील थकबाकीचा तात्काळ भरणा केल्यास वीजपुरवठा सुरळीत चालू होणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिल थकबाकीचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.