देशोन्नती वृत्तसंकलन,
चिखली/बुलढाणा (Sindkhedaraja Assembly Constituency) : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी मेरा बु. येथील माजी सभापती अशोकराव पडघान (Ashok Padghan) यांनी जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने (Assembly Constituency) निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सिंदखेडराजा विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी मिळावी. या करीता माजी सभापती अशोक श्रीराम पडघान यांनी दिलेल्या अर्जामध्ये म्हंटले आहे की, सिं. राजा विधानसभा क्षेत्रातील मेरा बु. गावचे रहिवासी मेरा बु. ग्रामपंचायतीचे सरपंचपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यानंतर राहुल बोंद्रे यांंच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळीराजा पॅनेलची उमेदवारी मिळाल्यानंतर ती अटीतटीची निवडणूक जिंकली व चिखली कृउबासचे सभापती म्हणून काम पहाले.
त्याच दरम्यान २०१२ च्या जि.प. निवडणूकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मेरा बु जि. प. सर्कलची निवडणूक लढवत विजय मिळवला. २०१७ च्या जि. प. निवडणूकीत मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांनी पत्नी सौ. ज्योतीताई पडघान यांना उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आणले. पक्षाने त्यांच्या वर जि. प. महिला बालकल्याण सभापती पदाची जबाबदारी दिली.ती देखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळत आपल्या कामाचा ठसा उमटवला. ह्या (Assembly Constituency) राजकीय कारकीर्दीसोबतच कायम शेतकरी, तरूण बेरोजगार व महिला आणि दिनदलितांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो. लोकांच्या कायम संपर्कात असलेला लोकप्रिय व्यक्ती अशी त्यांची ओळख सर्वदूर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना म.प्र.कॉंग्रेसचे सचिव धनंजय देशमुख, सभापती डॉ सत्येंद्र भुसारी, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सतीश मेहद्रे, डॉ. ईसरार,प्रा.गजानन खरात, शैलेश खेडकर, विठ्ठल चव्हाण, सर्जेराव पडघान आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.