बुलढाणा (Sindkhedaraja Assembly Election) : सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडी कमालीच्या वाढल्या त्या, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेवून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेल्यामुळे. त्यांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तिकीट फायनल समजल्या जात असून आतापर्यंत त्यांच्याचमुळे शांत असलेल्या महायुतीत नव्याने वेगवान हालचाली सुरु झाल्या असून अनेक दावेदार पुढे आले आहेत.
आ.डॉ.राजेंद्र शिंगणे हे घड्याळ घेवून लढतील, असे चित्र त्यावेळी असल्याने महायुतीकडून (Mahayuti Alliance) सर्वच इच्छूक जवळपास माघारीवर होते. कारण डॉ. शिंगणे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार राहणारच नाही, हे निश्चित होतं. परंतु डॉ. शिंगणे यांनीच हाती तुतारी घेवून महाविकास आघाडीत प्रवेश केल्यामुळे.. आता महायुतीकडून कोण? हा प्रश्न निर्माण झाला. अन् त्यावर तात्काळ पर्याय उपलब्ध होवू लागले.
महायुतीत (Mahayuti Alliance) ही जागा पुर्वीप्रमाणे शिवसेनेकडेच ठेवावी, असा आग्रह आता शिंदे गटातून होत आहे. (Sindkhedaraja Assembly Election) जर ही जागा शिवसेनेला सुटलीतर माजी आमदार शशिकांत खेडेकर व योगेश जाधव यांची नावे असून त्यांची तयारीही झालेली आहे. भाजपाचा प्रयत्न ही जागा पुन्हा मिळवून घेण्याचा आहे. २०१४ला या जागेवर भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. भाजपाकडून तोताराम कायंदे यांचे सुपूत्र डॉ. सुनिल कायंदे इच्छूक असून ते पंकजाताई मुंढे यांचे कट्टर समर्थक समजले जातात.
मात्र अजीतदादा पवार ही जागा सोडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कारण डॉ.शिंगणेंनी ऐनवेळी साथ सोडल्यामुळे त्यांना धडा शिकवल्याच गेला पाहिजे, असा चंग अजीतदादा व त्यांच्या समर्थकांनी बांधला आहे. विशेष म्हणजे डॉ. शिंगणे यांचे जवळचे समजले जाणारे अॅड. नाझेर काझी हे सुध्दा राष्ट्रवादी दादा गटातच कायम राहिले आहे. काँग्रेस पक्षातून मनोज कायंदे यांना राष्ट्रवादीत घेवून त्यांना लढवल्या जाऊ शकते का? असाही विचार आता दादा गटात सुरु असून त्या दृष्टीने जोरदार हालचालींनाही वेग आला आहे. एवूâणच, डॉ. शिंगणे महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) गेल्याने महायुतीतले अनेक चेहरे बाहेर पडले असून, त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.