हिंगोली(Hingoli) :- सेनगाव तालुक्यातील चोंडी बु.येथे जनसंवाद आशिर्वाद यात्रे निमित्त आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असता एका महिलेने साहेब आम्हाला कोणत्या योजना नको, पैसे नको; पण आमचे घरधनी शेतामध्ये गेल्यानंतर सुरक्षित घरी यावे यासाठी काही उपाय योजना आखा असा प्रश्न उपस्थित केल्याने आ.मुटकुळे काही वेळ नि:शब्द झाले होते.
आ. तान्हाजी मुटकुळेंच्या जनसंवाद आशिर्वाद यात्रेत महिलेने केला प्रश्न उपस्थित
शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना उपभोगता याव्या यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे जनसंवाद आशिर्वाद यात्रा काढली आहे. या दरम्यान चोंडी बु.येथे मालताबाई श्रीराम भाकरे या महिलेने आ.मुटकुळेंना गहिवरून टाकणारा प्रश्न उपस्थित केला. साहेब आम्हाला कोणत्या योजना व पैसा नको, आमचे घरधनी शेतात गेल्यानंतर रात्री परत येतील की नाही याची आम्हाला भिती असते, आमचे जगणे असाह्य झाले असून केव्हा कोणते जनावर येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या त्रासापासून मुक्त करा व आमचे संरक्षण(Protection) आणि सुरक्षितता हवी असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे काही वेळ नि:शब्द झाले. या भागातील शेतकरी सुरक्षित राहावा या या उद्देशाने त्यांनी वनमंत्री(Forest Minister) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. याचवेळी जिल्हाधिकार्यांनाही कॉनफरन्सवर घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुंपन करण्यास सव्वा कोटीचे अंदाजपत्रक तात्काळ तयार
वनविभागाच्या (Forest Department) असलेल्या जागेला कुंपन घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या संदर्भात तात्काळ कार्यवाही करून प्रस्ताव तयार केला. यावर मंत्रालयातील वनविभागातून १ कोटी २५ लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. २९ जुलैला जिल्हा नियोजन अधिकारी सु.न.जाधव यांनी विभागीय वन अधिकारी वनविभाग हिंगोली यांना दिलेल्या पत्रात चोरजवळा येथे वन संरक्षणाची कामे करण्याकरीता तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.