प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी
नांदेड (Nanded Zilla Parishad) : सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या (Asha Federation) नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी १० जुलै रोजीज म.गांधी पुतळा येथून दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि (Zilla Parishad) जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या मोर्चात आशा आणि गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रीय मागणी दिनानिमित्ताने सीटू कामगार संघटनेने देशव्यापी मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चातून प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात आशा व गटप्रवर्तकांना किमान, कर्मचारी दर्जा व पेन्शन द्यावे,गटप्रवर्तकांचे समायोजन करावे. (Asha Federation) आशा व गटप्रवर्तक ताईंनी लोकसभा निवडणुकीत वरिष्ठाच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडले आहे. परंतु बहुतांश कार्य केलेल्या ताईंना अद्याप निवडणूक भत्ता देण्यात आला नाही तो तात्काळ देण्यात यावा. राज्य सरकारने घोषित केलेले वाढीव मानधन तात्काळ देण्यात यावेत, जिल्हा परिषदेणे दिवाळी बोनस पाच हजार रुपये द्यावे,मागील सर्व थकीत मानधन व बील देण्यात यावे. गटप्रवर्तकांना घोषित केलेली दहा हजार वाढ देण्यात यावी. नैसर्गिक आपत्तीचे जुलै २०२३ मधील पूरग्रस्तांचे मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे
मुंबई मंत्रालय येथील मदत व पुनर्वसन विभागाचे सह सचिव संजय कुडवे यांना लेखी कळवून लेखाशीर्ष सुरु करून मागील सहा महिन्यापासून सुरु असलेले सीटू कामगार संघटनेचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी यांनी सोडवावे. मौजे वझरा शेख फरीद ता. माहूर येथील ग्रामसभा ठरावानुसार व पेसा कायद्यानुसार सूचित केलेली जमीन अधिग्रहण करावी व २५० प्लॉट्स पाडून द्यावेत, आदी मागण्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि संबंधित आरोग्य विभाग (Zilla Parishad) जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व फेडरेशनच्या (Asha Federation) अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार आणि सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या प्रा. रामचंद्र भरांडे सरांच्या उपोषणास पाठिंबा देत शिष्टमंडळाने उपोषणार्थीची भेट घेऊन चर्चा केली. (Zilla Parishad) जिल्हा परिषदेत सभा घेऊन निवेदन दिले आणि समारोप करण्यात आला. कॉ. उज्वला पडलवार यांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य आणि केंद्र सरकावर सडकून टीका केली. अ. भा. किसान सभेचे नेते कॉ. शंकर सिडाम यांनी पाठिंबा दिला.
ते म्हणाले की, शेतकरी देखील कामगारांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरतील आणि प्रशासनास धारेवर धरतील. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. शिलाताई ठाकूर, कॉ. वर्षा सांगडे, कॉ. सारजा कदम, कॉ. सुनीता पाटील, कॉ. जयश्री मोरे, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.मंगेश वट्टेवाड, कॉ. स. ना. राठोड आदींनी परिश्रम घेतले.