नवी दिल्ली (LAC) : LAC बाबत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे. या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. तसेच, दोन्ही देशांचे सैनिक तणावपूर्ण भागातून माघार घेत आहेत. दरम्यान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल (Upendra Dwivedi) उपेंद्र द्विवेदी यांनी (LAC) एलएसीच्या परिस्थितीबाबत मोठे विधान केले आहे.
भारत-चीन सीमेवरील सैन्य मागे हटवण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, एलएसीवरील परिस्थिती ‘संवेदनशील पण स्थिर’ आहे. पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचोकमधील पारंपारिक भागात गस्त घालणे आणि चराई सुरू झाली आहे आणि ती नियमितपणे होत आहे. तैनाती संतुलित आणि मजबूत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहोत. सध्या (LAC) सीमेवर पायाभूत सुविधा आणि क्षमता विकास वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा
जम्मू आणि काश्मीरबद्दल बोलताना जनरल द्विवेदी (Upendra Dwivedi) म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. परंतु (LAC) सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानसोबत नियंत्रण रेषेवर (एलओसी) युद्धबंदी सुरू आहे, पण घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला पाठिंबा देत असल्याने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा अबाधित आहेत. जनरल द्विवेदी म्हणाले की, गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये मारले गेलेले 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानचे होते.
मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल बोलताना जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) म्हणाले की, सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळे राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जनरल द्विवेदी म्हणाले की, सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे आणि (LAC) सरकारच्या सक्रिय पुढाकारांमुळे मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. हिंसाचाराच्या चक्रीय घटना सुरूच आहेत. परंतु लष्कर या भागात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. म्यानमार सीमेवर पाळत आणि वर्चस्व वाढवले जात आहे. कुंपण घालण्याचे कामही सुरू आहे.