दारव्हा(yavtmal ):- शहरातुन गोवंश तस्करी करतांना रात्रगस्ती दरम्यान दारव्हा पोलीसांनी शुक्रवार दि.७ जुनच्या मध्यरात्री १.०० वाजता दरम्यान सहा आरोपींना अटक केली.
शुक्रवारला मध्यरात्री दारव्हा पोलीस रात्रगस्तीवर असतांना यवतमाळ वरून दारव्हा कडे टाटा एस वाहन क्र. एम.एच.४० सि.एम. ७६९७ भरधाव वेगाने येतांना पोलीसांना दिसले. पोलीसांनी पाठलाग करून वाहन आडवून तपासणी (Inspection)केली असता त्या वाहनात पाच गोवंश जातीचे गोरे अतिशय निर्दयपणे बांधुन व कोंडुन नेतांना आढळून आले. या गोवंशाबाबत कोणतीही कागदपत्रे आरोपींकडे मिळुन आले नाही.तसेच या गोवंश तस्करीच्या वाहनाला अडथळा निर्माण होवू नये म्हणुन एक चारचाकी इर्टीगा वाहन क्र.एम.एच.०१ ए.एन.०३५६ हे सुध्दा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी दारव्हा पोलीसांनी प्राणी संरक्षन कायदयान्वये गुन्हा दाखल (Filed a case)करून आरोपी मुकेश दसरथ श्रीरामे,सुभाष भिमराव श्रीरामे ,युवराज दसरथ शंभरकर सर्व रा. भिवापुर जि. नागपुर तसेच रॉबिनसिंग गौर ,मो. रिजवान रा. हरू, मो. उबेद मो. शकील रा. मानोरा जि. वाशिम यांना अटक करून त्याचे ताब्यातुन पाच गोवंश दोन चारचाकी वाहन, ५ मोबाईल संच असा एकुन ११,००,००० लाख रू.चा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप , सहा. पोलीस अधिक्षक दारव्हा चिलुमुला रजनिकांत यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास कुलकर्णी, पोहवा महेद्र भुते , पोना सुरेश राठोड ,पोकॉ. युवराज चव्हाण, वाहन चालक किरण राठोड यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि धनंजय रत्नपारखी हे करीत आहेत.