हिंगोली (Sengaon Crime) : सेनगाव येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या वाळुची वाहतूक करणारे टिप्पर महसूल विभागाने जप्त करून सेनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. २ डिसेंबरच्या रात्री सेनगाव तालुक्यातील कवठा बु. येथे ६ ब्रास वाळुची अवैध वाहतूक करताना एक टिप्पर ज्याचा क्रमांक एम.एच.३७- ३८५५ आहे, महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला आहे.
या टिप्परच्या चालकाचे नाव गणेश विष्णू नागुलकर रा.वाढोणा असे असून बाळासाहेब खुशालराव सरनाईक रा. रिसोड हे सदर टिप्परचे मालक असल्याचे महसूल विभागाच्या पंच नाम्यात नमूद आहे. (Sengaon Crime) वाळुची अवैध वाहतूक करणारे हे टिप्पर महसूल विभागाच्या पथकाने जप्त करून सेनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.