हिंगोली (Hingoli combing operation) : जिल्ह्यात एकाच वेळी कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये गुन्हेगारांची तपासणी व अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी सहा अवैध व्यावसायिकांविरूद्ध कारवाई केली.
जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात १४ ते १५ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी (Hingoli combing operation) कोम्बींग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, मारोती थोरात, प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन काशीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, नरेंद्र पाडळकर, गणेश राहिरे, मोहन भोसले, नितीन तांबे, कुंदनकुमार वाघमारे, डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सानप, अनिल काचमांडे, राम निरदोडे, विजय रामोड, हनुमंत भिंगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे, विक्रम विठूबोणे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यातील दुय्यम अधिकारी व अंमलदार सहभागी होते.
मोहिमेत एकूण ५२ ठिकाणी जिल्ह्यातील मोक्कामधील फरार, तडीपार आदेश झालेले तसेच फरार, पाहिजे असलेले व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच मिश्र वस्तीमध्ये तपासणी करण्यात आली. न्यायालयात वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर राहत नसलेले व अटक वारंट निघालेल्या एकूण १७ जणांवर नॉनबेलेबल वारंट, ७ बेलेबल वारंट एकूण १ समन्स बजावणी करण्यात आली. भारतीय हत्यार कायद्यान्वये एकावर तर ५ संशयीत चोरटे व ६ अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. (Hingoli combing operation) मोटार वाहन कायद्यान्वये १३ जणांवर कारवाई केली. तसेच वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील बँक एटीएम तपासणी करण्यात आले.