पुसद (Yawatmal) :- पुसद शहरासह तालुक्यांमध्ये गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले आहे. आजचा तरुण भरकटलेला दिसत आहे. बेरोजगारीला कंटाळून शेवटी गुन्हेगारीकडे वळलेल्या या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.
गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले
खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाशिम रोड वरील आडगाव (फाटा ) येथील रस्त्याच्या कडेला दोन चार चाकी गाड्या, त्यामध्ये एक कार व एक बोलेरो पिकप रोडच्या साईडला अंधारामध्ये उभी करून 9 डिसेंबरच्या रात्री एक 45 वाजताच्या दरम्यान पाच ते सहा व्यक्ती दरोडा (robbery) टाकण्याच्या इराद्याने उभे असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांमार्फत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ च्या पुसद शाखेला प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य बघत तातडीने खंडाळा पोलिसांच्या मदतीने घटनास्थळ गाठत सापळा रचून पळून जात असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात आले.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पुसद खंडाळा पोलिसांची कारवाई
सदर आरोपी शेख महंमद शेख अफसर उर्फ बबलू वय 40वर्ष रा. पातुर जिल्हा अकोला, जावेद खान बरकत खान वय 40वर्ष रा. कारंजा तालुका खामगाव जिल्हा यवतमाळ, किशोर सुकलाल लहाने वय 27 वर्ष रा. अमडापूर ता. चिखली जिल्हा बुलढाणा, सागर अशोक वानखेडे वय 28 रा. अमडापूर ता.चिखली जिल्हा बुलढाणा, शेख जमील शेख सलीम वय 25रा. कारंजा ता. खामगाव जिल्हा बुलढाणा, सय्यद साबीर सय्यद सुलेमान वय 51 वर्ष रा. सिरजगाव देशमुख ता. खामगाव जिल्हा बुलढाणा अशी असून त्यांच्याकडील सिल्वर रंगाची टाटा इंडिको क्र. एम एच 23/वाय 4848व पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक एम एच -30/ ए बी 2682 या गाड्यांची पाहणी केली असता त्यामध्ये एक धारदार चाकू(knife), एक कोयता, दोन पेचकस, दोन पकड, एक लोखंडी टामी, एक बॅटरी, एक लोखंडी हातोडा, नायलॉन ची दूरी असे दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळून आले.
आरोपीचा रेकॉर्ड तपासत असतानाइलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार व इतर 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती
त्यावरून पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसद शाखेचे यांच्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 491/2024 चे कलम 310(4) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा (Crime) तपास सुरू असताना आरोपीचा रेकॉर्ड तपासत असताना यापूर्वी इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार (Electric aluminum wire) चोरीचे व इतर 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले त्या दृष्टीने आरोपीकडून अधिक तपासाकरिता सण 2023/24 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात खालील प्रमाणे एकूण 29 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत आरोपींना अधिक विचारपूस केली असता खालील गुन्ह्यातील चोरलेल्या मला पैकी काही माल त्यांच्याकडील पांढऱ्या अंगाच्या बोलेरो पिकप क्रमांक एम एच -30बीडी 3469 मध्ये लपून ठेवल्याचे सांगितले.
5200 अंदाजे किंमत रुपयांचा ॲल्युमिनियमच्या ताराचे 16 गठ्ठे वजन
त्याप्रमाणे पंचनामा करून सदर चोरीच्या माला पैकी 45, 200 अंदाजे किंमत रुपयांचा ॲल्युमिनियमच्या ताराचे 16 गठ्ठे वजन एकूण 452 किलो, तसेच इलेक्ट्रिक लोखंडी वजन काटा अंदाजे किंमत 5000 रुपये जप्त करून ताब्यात घेण्यात आला. सदर पथकाने आरोपींना दरोडासारखा गंभीर गुन्हा करण्यापासून रोखून आरोपींकडून एकूण अकरा लाख 61 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला व 29 गुन्हे उघडकीस आणले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रजनीकांत चिलूमुला , पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यवतमाळ, सपोनी गजानन गजभारे, सपोनी शरद लोहकरे, खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील,चाउपनि रवींद्र श्रीरामे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश जाधव, सुनील पंडागळे, यांच्यासह खंडाळा पोलीस स्टेशनचे (Police station)पोलीस कॉन्स्टेबल सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल अखिल चव्हाण यांनी सदरची कारवाई पार पाडली. या आरोपींनी केवळ अल्युमिनियम तारेच्या चोरच्या पुसद पोफळी महागाव खंडाळा आर्णी पुसद ग्रामीण नेर व दिग्रस या तालुक्यांमध्ये 29 गुन्हे केल्याची बाब उघडकीस आली आहे.