नागरीकात शंका- कुशंकांना पेव
आरमोरी (Skeleton Case Mystery) : आरमोरी शहरानजीकच्या अरसोडा जंगल परिसरात तीन दिवसापुर्वी अज्ञात युवक – युवतीचा सांगाडा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. हा (Skeleton Case Mystery) अहवाल आल्यानंतरच ‘त्या’ सांगाडा प्रकरणाचे रहस्य उलगडणार असल्याची माहिती आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैâलास गवते यांनी दै. देशोन्नतीस दिली.
अरसोडा येथील सुरज भाऊराव दिघोरे (३५) हे २५ एप्रिल रोजी आपला भाऊ आणि आईसह दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अरसोडा जंगल परीसरात कुड्याची फुुले तोडत असतांना जंगलामध्ये एका झाडाखाली २५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या युवक/युवतीचे प्रेत (Skeleton Case Mystery) कुजलेल्या स्थितीत आढळून आले. यामुळे घाबरलेल्या दिघोरे यांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून पाहणी केली असता प्रेत कुजलेल्या तसेच जळालेल्या स्थितीत आढळून आले. तसेच मयताचे तोंडातुन एक दात बाहेर आल्याचे दिसून आले.
मृतकाची उंची अंदाजे ०५ फुट ०५ इंच आहे. मृतकाच्या डाव्या पायाजवळ एक लहान आकाराचा हाताचा पंजा व उजव्या हाताच्या पंजामध्ये लहान आकाराचा हाताचा पंजा दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून आकाशी रंगाचा टी-शर्ट, पिळसर काळ्या रंगाचा गमचा, लेटर पॅडचे हुक, स्मार्ट वॉच, मोबाईल चार्जऱ- Rा्स्ग् कंपनीचा मोबाईल आदी साहित्य जप्त केले. या (Skeleton Case Mystery) घटनेसंदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ठाणेदार गवते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सद्यास्थितीत काहीही सांगता येणार नसल्याचे सांगितले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे ठाणेदार गवते यांनी सांगितले. यामुळे प्रकरणाचे रहस्य कायम आहे.