भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणक महोत्सव समिती बुलढाणा
जिल्ह्याच्या सदस्यांनी पत्रद्वारे केली होती मागणी
बुलढाणा (Jain Samvatsari) : जैन धर्मियांचे आस्था असलेले जैन संवत्सरी महापर्व निमित्त संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कत्तलखाने व मांसविक्री दिनांक ७,८ व १७ सप्टेंबर रोजी बंद राहणार असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कत्तलखाने व मांसविक्री दिनांक ७,८ व १७ सप्टेंबर रोजी बंद राहावे अशी मागणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मा.ना. मंगलप्रभातजी लोढा, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय जैन महा संघाचे अध्यक्ष ललितजी गांधी व जैन प्रकोष्ट चे प्रदेशाध्यक्ष संदीपजी भंडारी यांच्या मार्गदर्शनात भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणक महोत्सव समितीचे बुलढाणा जिल्ह्याचे सदस्य विजय बाफना, सदस्य तेजस भंडारी,सदस्य डॉ. योगेश पाटणी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे केली होती.
याप्रसंगी (Jain Samvatsari) निवेदन देताना गौतमजी बेगाणी, प्रकाशजी देशलहरा, सचीनजी वाडेकर, चेतनजी महाजन, मनोजजी पाटणी, ललितजी कोठारी, प्रदीपजी बेगाणी, सतीशजी कोठारी, प्रितेशजी बेदमुथा, ऍड.धीरजजी घोटी, प्रतापजी कोठारी, महावीरजी ओसवाल, अक्षयजी देशलहरा , शितलजी गदिया, शुभम कोठारी यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते. ही मागणी पूर्ण करण्यात आली असून, त्यासंबंधी आदेश ही काढण्यात आले आहे. यानिमित्त जिल्हाधिकारी साहेब यांचे भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणक महोत्सव समिती बुलढाणाचे प्रमुख सदस्य विजय बाफना यांनी आभार व्यक्त केले.