सेलु/परभणी (Parbhani):- सेलूशहरात मागील ४ जुलैपासून मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर अँड.विष्णू ढोले डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळा परिसरात आमरण उपोषणास बसले आहेत.
पोलिसाच्या चोख बंदोबस्ताचा शहर बंद वर झाला परिणाम..!
आज बुधवार १० जुलै उपोषणाचा सातवा दिवस आहे.या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने पाठ फिरवल्यामुळे आणि कसल्याच प्रकारची दखल घेण्यात न आल्यामुळे आमरण उपोषणाला समर्थन देणाऱ्या मुस्लिम बांधवांनी १० जुलै रोजी सेलू बंदची हाक दिली होती. अशी अधिकृत घोषणा अथवा बंद करण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे आणि बंद दरम्यान खबरदारी म्हणून पोलीसांनी काही जणांना ताब्यात घेतल्यामुळे तसेच पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे (settlement) बंदची फजगत झाली आहे. दरम्यान अँड विष्णू ढोले यांच्या उपोषण स्थळी १० जुलै रोजी ऑल इंडिया पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.