सावली (Snake bites Death) : सर्पदंशाने एका महिला मजूराचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली साधना रमेश भैसारे (४०) असे मृत महिला मजूराचे नाव असून ती केरोडा येथील रहिवाशी होती. ख़रीपाचा हंगाम असल्याने या मोसमात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. त्यामुळे पुरुषासह महिला मोठ्या प्रमाणात शेती बांधावार काम करताना दिसतात, तर कुणी मजूर गुता तर कुणी रोजंदारीने काम करुन खरीपाच्या हंगामातील मोसमात उतपन्न मिळवून घेतात. मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबाचा प्रपंच चालविण्यास मोठी मदत निर्माण होते. त्यामुळे बहुतांश महिला मजूर धानपिकाच्या कामानिमित्य शेती बांधावार दिसुन येत आहे. ख़रीपातील रोवनी, निंदनाचे काम झाल्यानतर महिला मजूराना या भागात मुळातच रोजगात उपलब्ध नसल्याने धानपिक रोवनी ते निंदनाचे काम मोठ्या हिमतीने करीत असतात.
सततच्या पावसामुळे यंदा शेती बांधावर महागड्या कीटक नाशकाची फवारणी करूनही मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला असून त्यात सरपटणार्या जीवांसाठी दडून बसण्याचे ठिकाणा बनले आहे. त्यामुळे मजूरांना शेती बांधावरील कचर्यातुन ये-जा किंवा कच र्यावर बसूनच जेवन करावे लागते घटनेच्या दिवशी मृतक महिला मजूर प्रशांत ढोलने यांच्या शेतात धानपिक रोवनीसाठी गेली असता रोवनीचे काम आटोपल्याने काही महिला मजूरासहीत शेती बांधावार जेवन करीत असताना दि.२१ ऑगस्ट बुधवार रोजी ११.३० वाजताच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतला मृतक (Snake bites Death) महिला मजुराला अस्वस्थ आणि प्रकृति चिंताजनक होत गेल्याने तिला लागलीच सामान्य रुग्णालय गड़चिरोली येथे उपचारार्थ भर्ती करन्यात आले परिणामी उपचारा दरम्यान महिला मजूराचा मृत्यु झाला. तिच्या अकाली निधनाने परिवारात दुखांचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे मृतक महिला मजूराच्या पश्च्यात पति एक मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.
सर्पदंशाने शेतकर्याचा मृत्यू
चंद्रपूर : जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्याला सर्पदंश (Snake bites Death) झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि.२० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील वेंडली शेतशिवारात घडली. अशोक शामराव पिंपळशेंडे असे मृत शेतकर्याचे नाव आहे. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली आहेत. उपजीविकेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माहिती मिळताच भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सात्वन केले. आपाद्ग्रस्त कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदत केली. त्यांनी गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत या कुटुंबाला त्वरित मदत मिळावी, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.