दारव्हा तालुक्यातील घटना
कारंजा (snakebite) : लग्नकार्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने (snakebite) मृत्यू झाला .ही घटना दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथे शनिवारी 4 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पूजा सरदार चव्हाण वय 13 वर्ष असे सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव असून ती (Karanja Taluka) कारंजा तालुक्यातील भडशिवणी येथील रहिवासी होती.
मृतक मुलगी भडशिवनी येथील रहिवासी
प्राप्त माहितीनुसार, एका लग्नकार्यासाठी ती दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाण येथे गेली होती. त्यानंतर शनिवारी रात्री ती बाहेर गेली असताना तिला (snakebite) सर्पदंश झाला. परंतु तिने कुणालाही सांगितले नाही. त्यानंतर रविवारी सकाळी तिला अस्वस्थ वाटल्याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी (Karanja Hospital) कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरांनी दिला मृत घोषित केले.