Parbhani Hacking:- पती पत्नीचे बँक खाते हॅक (Hack)करून युपीआय मनी ट्रान्स्फरींग(UPI Money Transferring) अॅपद्वारे युपीआय आयडी वापरून अज्ञात आरोपीने विविध बँक खात्यात १७ लाख रूपयाची रक्कम वळती करून फसवणूक केली. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीवर ३० सप्टेंबर रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीचा(fraudulently) हा प्रकार १ जानेवारी २०२४ ते ९ सप्टेंबर २०२४ या दरम्यान घडला.
फिर्यादी हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी
विठ्ठल तिडके यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी (Retired Medical Officer) असून ज्ञानेश्वर नगर येथे वास्तव्याला आहेत. अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यातून तसेच फिर्यादीच्या पत्नीचे बँक खाते हॅक करत यूपीआय मनी ट्रान्स्फरींगद्वारे आयडी वापरत अज्ञात आरोपीने आपल्या विविध बँक खात्यामध्ये तांत्रिक साधनाच्या सहायाने फिर्यादीच्या बँक खात्यातून १७ लाख रूपये वळते करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तपास पोनि.शरद मरे करत आहेत.