परभणी (Parbhani) :- देवदर्शन करुन रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशाजवळील बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. सदर बॅगेत सोन्याचे दागिने व इतर साहित्य होते. साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे प्रवाशाला परभणी रेल्वे स्थानकावर लक्षात आले.
बॅगेत सोन्याचे दागिने व इतर साहित्य होते
या प्रकरणी १४ जानेवारीला अनोळखी चोरट्यावर गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला आहे. नागेश धारावत यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे पत्नी सोबत रेल्वेने (Train)प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी अज्ञाताने फिर्यादीच्या पत्नी जवळील पर्स चोरली. सदर पर्समध्ये दागिने व इतर साहित्य होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात रेल्वे प्रवासातील चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.