न्यायाची संकल्पना फक्त कायद्यांपुरती मर्यादित नसून, ती दैनंदिन जीवनात अंगीकारली पाहिजे..!
सामाजिक न्याय दिवस (Social Justice Day) : जागतिक सामाजिक न्याय दिवस हा दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश समाजातील सर्व घटकांना समान संधी (Equal Opportunity) आणि हक्क मिळवून देण्यासाठी जागरूकता वाढवणे हा आहे. सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, लिंग, आर्थिक स्तर किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव (Discrimination) न करता, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार (Equal Rights) मिळणे.
हा दिवस विशेषतः दुर्बल, वंचित आणि शोषित घटकांच्या (Adsorbed Element) हक्कांची जाणीव करून देतो. गरिबी, अशिक्षितपणा, लिंग असमानता आणि जातीय भेदभाव यांसारख्या समस्यांवर तो प्रकाश टाकतो. शासन (Government) आणि सामाजिक संस्था विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून समतेचा संदेश देतात.
सामाजिक न्यायाची संकल्पना (Concept of Social Justice) फक्त कायद्यांपुरती मर्यादित नसून, ती आपल्या दैनंदिन जीवनातही अंगीकारली पाहिजे. सर्वांनी मिळून एक समताधिष्ठित आणि न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, कारण सामाजिक न्याय (Social Justice) हेच प्रगतीचे खरे लक्षण आहे.
जागतिक सामाजिक न्याय दिनाचा इतिहास..!
2007 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (United Nations General Assembly) 20 फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक दिन म्हणून घोषित केला. जगभरात सामाजिक न्याय, एकता आणि संसाधनांचे न्याय वाटप करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागतिक सामाजिक न्याय दिन पहिल्यांदा 2009 मध्ये साजरा करण्यात आला. गरिबी, असमान वागणूक आणि बेरोजगारी कमी करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.