बुलडाणा(Buldhana):- सोशल मीडियाचा(Social media) वापर राजकारणात आता प्रभावीपणे होऊ लागला असून, पक्षी व संघटना वाढीसाठी सकारात्मक पद्धतीने आपली वैचारिक व विकासात्मक भूमिका मांडून युवकांनी सक्रिय राहण्याचे आवाहन धर्मवीर रामदास संजय गायकवाड यांनी केले.
जोमाने काम करू आणि शिवसेना घरा-घरापर्यंत पोहोचवू
आज रविवार २३ जून रोजी बुलढाणा विधानसभा (Assembly) मतदार संघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे बुलढाणा तसेच मोताळा तालुक्यातील युवासेनेचा(Yuvasena) पदाधिकारी नियुक्ती मेळावा पार पडला. यावेळी संजुभाऊंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवकांनी शिवसेना (Shivsena) व युवासेनेमध्ये जोमाने काम करू आणि शिवसेना घरा-घरापर्यंत पोहोचवू असे सांगितले. या कार्यक्रमात आ. संजय गायकवाड यांच्या तसेच महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवासेना जिल्हाप्रमुख युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते उपस्थित बुलढाणा तसेच मोताळा तालुक्यातील युवकांना युवासेना तसेच सोशल मीडियाची नियुक्तीपत्र देण्यात आली.
यावेळी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, प्राध्यापक अनिल रिंढे यांच्यासह शिवसेना युवासेना बुलढाणा तसेच मोताळा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.