चिखली (Buldhana) :- तालुक्यांतील १२५ हेक्टर गावठाण सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण (encroachment) नाही असे दाखवून सौर ऊर्जा कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यामुळे शेकडो मागासवर्गीय गोरगरिबांचे अतिक्रमण निष्कशीत करण्याचा घाट घातल्या जात आहे त्यामुळे सरकारने अतिक्रमण धारकावर घोर अन्याय न त्यांना त्यांचे अतिक्रमण कायम ठेवावे अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे वंचीत बहुजन आघाडी पक्षाचे(Vanchit Bahujan Aghadi Party) चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर यांनी तहसिलदार यांच्या मार्फत १४ जुलै रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे.
प्रकल्पाला विरोध असतांना सुध्दा जमिनीवर अतिक्रमण नाही
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सौर ऊर्जा (Solar energy) कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी चिखली तालुक्यातील १२५ सरकारी गावठाण गायरान जमिनीवर हा प्रकल्प उभा होत असतांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण असतांना सुध्दा जमिनीवर अतिक्रमण दाखविले नाही आणि गुपचूपपणे ग्रा.प. ठराव शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु अतिक्रमण धारकाकडे सरकारी गावठाण जमिनीवर सन १९९० पुर्वीचे अतिक्रमण केल्याच्या नोंदी आहेत असे असतांना सुध्दा त्या जमिनीवर सन २०१७ पासून नोंद घेणे बंद केले आहे. परंतू २०१७ च्या अगोदरच्या अतिक्रमणाचा कोणताही उल्लेख शासन स्तरावर तलाठी, मंडळ अधिकारी व तत्सम अधिकारी यांनी जाणीव पूर्वक असे अतिक्रमण असल्याचे दाखवले नाही. आणि अशा प्रकल्पाला विरोध असतांना सुध्दा जमिनीवर अतिक्रमण नाही असे दाखवून जाणीव पूर्वक गोरगरिबावर अन्याय केला जातो आहे. सन २०१७ च्या अगोदरच्या सरकारी जमीनीवर नोंद असलेल्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हे कोणत्याच प्रकल्पासाठी निष्कशीत करण्यात येऊ नये सदर अतिक्रमण धारक यांच्याकडे जवळपास ६० ते ७० वर्षापूर्वीचे अतिक्रमणाचे पुरावे आहेत.
गंभीर स्वरुपाच्या जिवीत हानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील
सदर अतिक्रमण धारकांच्या अज्ञानामुळे त्यांचे शासन स्तरावर कायम पटयासाठी नोंद जाणीव पूर्वक घेण्यात आलेली नाही. तरी अशा अतिक्रमण धारकांना १९९० च्या कायम पटयाच्या आधारे त्यांचे पुरावे तपासून नोंदी करून घेण्यात याव्यात व त्यांच्या जमिनीवर कोणतेच प्रकल्प उभे करण्यात येऊ नये. अशा प्रकारचे निर्देश शासनाने संबंधीत जिल्हयाधिकाऱ्यांना दयावेत. सदर जमिनीवर शासन कायदयाचा व बळाचा वापर करून चुकीच्या अहवालाव्दारे अतिक्रमण निष्कशीत करतांना काही गंभीर स्वरुपाच्या जिवीत हानी (Loss of life) झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. अशी परीस्थिती उदभवू नये म्हणून शासनाने त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हा कार्यकारणीच्या नेतृत्वात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे वंचीत बहुजन आघाडीचे चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.