संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान,
तर परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या शेतावर अतिक्रमण
पुसद (Solar Energy) : सध्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वर चालणारे मोठे लाइट्स बसविण्याचे काम सुरू आहे. सदरील काम हे दिल्ली येथील एक विशिष्ट कंपनी करीत असल्याचे समजते. तर या कामांचं नियंत्रण नेमकं आहे कोणाकडे हे कळण्यास मार्ग नाही. संबंधित कंपनीचे कामगार अधिकारी हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांची परवानगी न घेता सौर ऊर्जेचे खांब रोवत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर या (Solar Energy) कंपनीला कुणी अधिकार दिला शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या शेतामध्ये अतिक्रमण करून खांब राहण्याचा. असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील महावितरण चे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना या संदर्भात विचारणा केली असता. त्यांनी व्यक्तिगत स्वरूपात हा विषय घेऊन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न पत्रकारांनी मांडायचे नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर येथील महावितरणचे उपअभियंता कोटांगडे व संबंधित महावितरणचे अधिकारी कर्मचारी लाईनमन नेमकं करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोंढी येथील शेतकरी दीपक परिहार यांच्या शेतामध्ये विनापरवानगी या कंपनीने खांब रोवले आहेत. शेतकरी दीपक परिहार व दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी दीपक महाडिक हे स्पॉटवर जाऊन पाहणी केली असता संबंधित कंपनीचे अनधिकृत कृत्य उघड झाले आहे. (Solar Energy) महावितरण चे कार्यकारी अभियंता चव्हाण हे आपली जबाबदारी झटकत आहेत. तर नागरिकांचे प्रश्न हे अधिकारी सोडणार नाही तर यांचं काम काय? या गंभीर बाबीकडे पुसदचे लोकप्रतिनिधी तथा विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे विशेष.