अ.भा. छावा संघटनेची सहकार मंत्र्यांकडे मागणी
लातूर (Solar Power Pump Yojana) : शेतीसाठी सौर ऊर्जा पंपाची योजना असल्याचे कारण पुढे करीत सध्या कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन देणे बंद असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे सरकारने (Solar Power Pump Yojana) शेतीसाठी वीज कनेक्शन देण्यास पूर्ववत सुरुवात करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली.
शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य सल्लागार भगवानदादा माकने, जिल्हाप्रमुख दिपकराव नरवडे, उपाध्यक्ष मनोज लंगर, वि.आ. जिल्हाप्रमुख मनोज फेसाटे, रमाकांत करे, सुदर्शन ढमाले, विष्णु करे, महेश बिस्वास, गोपाळ चाळक आदींच्या शिष्टमंडळाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले.
सध्या महावितरणकडून शेती पंपाचे कुठलेही नवीन कनेक्शन दिले जात नाही, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पाणी असून विजेअभावी शेतकरी शेत पिकवू शकत नाहीत. ज्यांनी सौर पंप (Solar Power Pump Yojana) घेतले अशा शेतकऱ्यांच्या खोलवरच्या पाणी या पंपाद्वारे उपसा होत नाही. त्याची क्षमता अपुरी पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत असून आपण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करावा व येत्या अधिवेशनात हा विषय मांडावा असे साकडे यावेळी शिष्टमंडळाने मंत्र्यांना घातले. तूर्तास शेती पंपाना नवीन वीज (Solar Power Pump Yojana) कनेक्शन देण्याचे आदेश महावितरण कंपनीला देण्यात यावे, अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.