वसमत/ हिंगोली (Soldier martyred) : वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी असलेले (Indian Army) भारतीय सैन्यदलातील जवान अंकुश एकनाथ वाहुळकर हे बिहार मधील पूर्णिया जवळ सैन्यदलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात शहीद (Soldier martyred) झाले आहेत. २२ मे रोजी ही घटना घडली. २४ मे रोजी गुंज येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सिक्कीम येथे ते सैन्यदलात कार्यरत होते.
वसमत तालुक्यातील जवान अपघातात शहीद
वसमत तालुक्यातील (Vasmat taluka) मौजे गुंज येथील अंकुश एकनाथ वाळूकर वय वर्षे २४ हे २०२१ पासून भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. तेव्हापासून ते कर्तव्यावर होते. काही दिवसापूर्वीच ते सुट्टीवर गावाकडे येऊन पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी परत गेले होते. बुधवारी रांची वरून सिक्कीम आर्मीकॅम्पकडे सैन्यदलाच्या वाहनातून सैन्याची तुकडी जात असताना पूर्णियाजवळ झिरोमाइल भागात सैन्यदलाच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात अंकुश एकनाथ वाहुळकर हे शहीद (Soldier martyred) झाले. घटनेची माहिती गावात समजताच, गुंज गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा हा तरुण गावात सर्वांचा चाहता होता.
गुंज गावावर पसरली शोककळा
लहानपणापासून सैन्य दलात (Indian Army) जाण्याची त्यांना आवड होती. २०२१ मध्ये परभणी येथे झालेल्या मिलिटरी भरती कॅम्पमध्ये ते सैन्य दलात भरती झाले होते. वसमत तालुक्यातील गुंज आसेगाव येथेच त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे. २४ मे रोजी गुंज येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इत्तमामाचा अंत्यसंस्कार होणार आहेत. (Soldier martyred) घटनेचे वृत्त समजल्यापासून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिक नातेवाईक गावकरी मंडळी कुटुंबीयांचे सांत्वन करत आहेत.