बुलढाणा (Soldier Deepak Bansode) : तालुक्यातील पळसखेड नागो बुलढाणा पासून अवघ्या १२ कि.मि. अंतरावर असलेलं गाव येथील अठराविश्व दारिद्र्यात असलेले मोलमजुरी करणारे भूमिहीन दिवाकर बनसोडे यांचे कुटुंब यांना तीन मुले व एक मुलगी यातीलच दोन नंबरचा (Soldier Deepak Bansode) दीपक दिवाकर बनसोडे सन २०१९ ला सैन्य दलात भरती झाला आणि दीपकच्या नावाप्रमाणे घराचा दीपक ज्योत सुरू झाली. गेल्या वर्षी शहीद दीपकचे लग्न झाले पत्नी सुद्धा अश्विनी मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहे. दोघांच्याही हातात देशाची सेवा करण्याचे कार्य आले.
आई-वडिलांना स्वप्न रंगविण्याचे दिवस आले. शून्यातून विश्व निर्माण करणारे हे कुटुंब या कुटुंबातीलच प्रमुख दीपक यांची ज्योत दिनांक 22 सप्टेंबर रोजी (terrorist attack) आतंकवादी हल्ल्यात विझली . अशा या (Soldier Deepak Bansode) दीपकच्या वीरमरणामुळे त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे त्यांच्या शेवटपर्यंत लढणारा लढवय्या अखेर शहीद झाला गावावरच नव्हे तर अख्या बुलढाणा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला.
एका छोट्याशा खेड्यातील भूमिहीन भूमिपुत्र (Soldier Deepak Bansode) दीपक दिवाकर बनसोडे यांनी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात प्रत्युत्तर देत असताना वीरमरण आले.२२ सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीर येथे हेडकॉटर सेवन सेक्टर आर आर या ठिकाणी ते शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वाजेच्या सुमारास विमानाने त्यांचा मृतदेह मुंबई येथे आणण्यात आला आज २४ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथून सकाळी ८:००वाजता त्यांच्या मूळ गावी त्यांच्या रथासोबत बाईक रॅली निघणार आहे. ठिक १०:०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ बहीण असा मोठा आप्त परिवार आहे. अशा या देशभक्त परिवाराला देशद्रोहांची नजर लागली आणि दीपक ची ज्योत वीरमरणात विझली.