ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन
हिंगोली (Primary Teachers) : शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा शिक्षक आनंदी असेल तरच तो आनंददायी शिक्षण देऊ शकेल त्यामुळे राज्यातील (Primary Teachers) प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य (Primary Teachers) प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारी मंडळ सभा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न झाली त्यावेळी गोरे बोलत होते. या सभेस विधान परिषदेचे तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे आमदार प्रवीण स्वामी ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना ग्रामविकास मंत्री म्हणाले की, प्राथमिक शिक्षकांच्या कार्यक्रमांना जाण्याचा मला नेहमीच योग येतो. राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासकीय यंत्रणेतील काही लोक प्रश्न सोडवण्याऐवजी त्याची गुंतागुंत वाढवण्यामध्ये धन्यता मानतात. या प्रश्नातील गुंतागुंत कमी होऊन प्रश्न निकाली काढणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्यातील प्राथमिक शाळातील गुणवत्ता वाढावी यासाठी या प्रश्नांच्या
सोडवणूकीस राज्य शासन प्राधान्यक्रम देत आहे.
विधान परिषदेचे तालिकाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शिक्षक संघाचे कार्य उत्कृष्ट असल्याचे नमूद केले. (Primary Teachers) प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबरोबर गुणवत्ता वाढीला प्राधान्य देणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की मी धाराशिव जिल्ह्यात शिक्षक संघाचा कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केले याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात काम करण्याची मला संधी मिळाली आहे.प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न माझे स्वतःचे प्रश्न समजून मी त्याच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करेल.
ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की,शासनाची धोरणे सरकारी शाळा टिकवणारी व त्यांना प्रोत्साहन देणारी असावीत. शालेय शिक्षण विभागाचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय सरकारी शाळांना अडचणीत आणणारा आहे तो तातडीने रद्द करण्यात यावा. शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील यांनी शिक्षक संघाच्या वाटचालीचा इतिहास मान्यवरांसमोर मांडला.
१८ जून २०२४ च्या बदली धोरणात शिक्षक हिताच्या सुधारणा व्हाव्यात,मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी,१५ जून २०२४ चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा, बदली प्रक्रियेपूर्वी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांना १०,२०,३० आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी मंत्री महोदयासमोर मांडल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस लायक पटेल, कार्याध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, कोषाध्यक्ष संभाजी बापट, सल्लागार दिनकर भालतडक, बाळासाहेब काळे, सिद्धेश्वर पुस्तके, राजाराम वरुटे, स्मिता सोहनी, वसंत हारुगडे, बापूसाहेब तांबे, विक्रम पाटील, विजय बहाकर, प्रसिद्धीप्रमुख रविकिरण साळवे यांचेसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हिंगोली जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर विठ्ठल पवार रामराव वराड ,किशन घोलप ,विकास फटांगळे ,अंगद साबणे ,रविंद्र देशपांडे ,गजानन सायगन , रमेश थोरात ,संदिप वारगे ,सुनिल गुरव ,विजयकुमार देसले ,ज्ञानेश्वर सोनवणे यासह शिक्षक संघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री यांना महाराष्ट्र राज्य (Primary Teachers) प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तारफा हे आदिवासी वाद्य भेट देण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कार वारली पेंटिंग व पुस्तके देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी केले.आभार सरचिटणीस लायक पटेल यांनी मानले. सूत्रसंचालन ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष भगवान भगत यांनी केले.