Nanded Crime :- परभणी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळील संविधानप्रतीकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर परभणी शहरात दगडफेक – जाळफोळ करण्यात आली होती. यात सहभागी झाल्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी या युवकाला पोलिसांनी अटक केली होती.
शहरात दगडफेक – जाळफोळ केल्याप्रकरणी युवकाला अटक
मात्र न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू (Death)झाला त्यानंतर आज आंबेडकर अनुयांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.त्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या समर्थनात आज नांदेड बंद करून शहरातील आयटीआय चौकात आंबेडकरी अनुयायी व रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करत परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध (Prohibition) आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी (Merchants) देखील आपले दुकाने / प्रतिष्ठाणे बंद करून या बंद मध्ये सहभागी झाले आहेत.