आ. सुरेशधस यांच्या वक्तव्याचा निषेध
पत्रकार परिषदेत विजया सुर्यवंशी यांचे आरोप
परभणी (Somnath Suryavanshi) : माझा मुलगा सोमनाथच्या मृत्यूनंतर आ. सुरेश धस यांनी भेट घेतल्यानंतर (Somnath Suryavanshi) सोमनाथ मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री चुकीची कारणे देत आहेत. सोमनाथला न्याय मिळायला हवा, असे म्हणाले होते, मात्र, आता तेच आ. धस पोलीस प्रशासनाची बाजू घेत सुर्यवंशी परिवाराने पोलिसांना माफ करावे, असे म्हणत आहेत. धस साहेब आम्ही खूप लहान माणसं आहोत, पोटच्या गोळ्याचा खून करणार्यांना माफ करण्याएवढे मोठे नाहीत, संतोष अण्णाच्या मारेकर्यांना तुम्ही माफ करणार का ? असा सवाल मयत (Somnath Suryavanshi) सोमनाथच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिले.
नाशिक येथे लाँग मार्चच्या सांगता प्रसंगी आ. सुरेश धस यांनी पत्रकारांशी बोलताना पोलिस प्रशासनाची बाजू घेत त्यांना सुर्यवंशी कुटूंबाने माफ करावे, असे वक्तव्य केले होते. यावर सोमवार १० फेब्रुवारी रोजी परभणीत मयत (Somnath Suryavanshi) सोमनाथ सुर्यवंशीच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. धस यांच्या विधानाचा निषेध केला. पुढे बोलताना विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या, सुरेश धस यांना मी कधीच माफ करणार नाही. आंदोलने थांबवण्यासाठी शासन दबाव तंत्राचा वापर करत आहे.
अन्याय करणार्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू केले आहे. (Somnath Suryavanshi) अशा चमच्यांमुळेच लाँग मार्च माघारी फिरला. केवळ चार पोलिसांना निलंबित करून हा विषय संपणार नाही. जोपर्यंत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे विजयाबाई सुर्यवंशी यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर म्हणाले की, आ. सुरेश धस जातीयवाद करत आहेत. एका बाजूला मराठा सरपंच संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलने करतात, पण दुसर्या बाजूला पोलिसांनीच दलीत (Somnath Suryavanshi) सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली असताना मारेकर्यांना माफ करण्याची मागणी करतात. वंचित बहुजन आघाडी सूर्यवंशी कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.