परभणी (Ramdas Athawale) : सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत आहे. ज्या पोलिसांवर हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला यांना भेटून प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार असे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना रामदास आठवले यांनी आज सोमवार ३० डिसेंबर रोजी भेट दिली. या भेटीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांशी बोलताना ते (Ramdas Athawale) म्हणाले की ‘ पोलिसांनी सुरुवातीला सोमनाथच्या मृत्यु हार्ट अटॅक मुळे झाल्याचे सांगितले. त्याच्या बॉडी वरील जखमा आहेत. पोस्ट मोर्टम रिपोर्टवरून त्याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे दिसत आहे. आंदोलक रस्त्यावर उतरले परंतु त्यामुळे विशेष काही नुकसान झाल्याचे दिसत नाही. पोलिसांनी युवक स्त्रिया यांना निर्घृण मारहाण केली हे समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. पोलिसांनी केलेली निर्घृण मारहाण चुकीची होती.
सोमनाथ (Somnath Suryavanshi) यास कोठडीत मारहाण करण्यास जे कुणी पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. संविधान प्रतिकृतीची विटंबना करणारा माथेफिरू बद्दल ते म्हणाले ‘या घटनेतील पवार नावाचा व्यक्ती अजिबात मनोरुग्ण नाही. त्याने ठरवून कृत्य केलेलं आहे. त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.’ निधन पावलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या स्मारकासाठी नगरपालिकेने जागा दिली तर सामाजिक न्याय विभागाकडून भरीव निधीची तरतूद करू असेही ते (Ramdas Athawale) म्हणाले. पोलिसांकडून मारहाण झालेल्या अनेक लोकांनी आठवले यांच्या पुढे हातापायांना झालेल्या जखमा, फॅकचर दाखवून कारवाईची मागणी केली. सावली रेस्ट हाउस या ठिकाणी झालेल्या या पत्रकार परिषदेस आठवले यांच्यासह डॉ.सिद्धार्थ भालेराव, दिलीप जोशी, बापूराव कदम, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.
रिपाइंकडून ५ लाखाची मदत
संविधान विटंबना आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्यावतीने ५ लाख रुपये देण्यात येतील. त्यांच्या कुटुंबीयास भरीव मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्याना बोलणार आहे. तसेच लोकनेते विजय वाकोडे यांच्या स्मारकासाठी मनपाची जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. जागा उपलब्ध झाल्यास आमच्या खात्याकडून निधी देण्याचाही प्रयत्न राहिल.
– ना रामदास आठवले