कारंजा(Washim) :- कुत्रा रस्त्यात आल्याने झालेल्या मोटारसायकल अपघातात मुलगा, वडील व जावई जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गंगापूर फाट्याजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, मुलगा अमोल देविदास गाडेकर (३५) , वडील देविदास नामदेव गाडेकर (६५ , दोघेही रा.हातोला ता.नेर परसोपंत जि.यवतमाळ) व जावई राजू शामराव खराडकर (३४, रा.नेर जि.यवतमाळ) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही जण एमएच २९- ७२६५ क्रमांकाच्या मोटारसायकलने (Bike)हातोला येथून कारंजा येथे येत होते. मार्गात कुत्रा (Dog)रस्त्यात आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून तिघेही रस्त्यावर कोसळले. या घटनेत तिघांनाही दुखापत झाली. त्यांच्यावर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.