जिल्ह्यातील सोनपेठ – शेळगाव रस्त्यावरील घटना
परभणी/सोनपेठ () : सोनपेठ ते परभणी या महामार्गावरील महाविष्णू तांडा येथे भरधाव वेगाने जाणारा अॅटो अचानक पलटी होऊन झालेल्या (Sonpeth Accident) अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार १६ सप्टेंबर रोजी घडली.
गंभीर जखमी महिलेस परभणीला हलविले
सोनपेठ हे तालुक्यांचे केंद्र असल्याने या ठिकाणी नोहमीच मोठी गर्दी असते. सोमवार १६ सप्टेंबर रोजी आठवडी बाजार होता. एम.एच.२२ एच ३९७५ अॅटो चालक प्रवाशी घेऊन सोनपेठकडे जात असताना महाविष्णू तांडा परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अॅटो पलटी (Sonpeth Accident) झाला. यामध्ये सुरेखा मारुती सुखनर (४०वर्षे या. काळगाववाडी), ललीता चव्हाण (वय ३० वर्षे रा नरवाडी,) कोंडिबा पांचाळ (वय६० रा शेळगाव), आराध्या चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना डॉ संग्राम तळेकर, मुंजा आळशे यांनी रुग्णवाहिकेने सोनपेठ येथे उपचारासाठी दाखल केले. डॉ सिध्देश्वर हालगे यांनी प्राथमिक उपचार केले आहे. सुरेखा सुखनर यांना जबर मार लागल्याने त्यांना परभणी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच
सोनपेठ ते शेळगाव या महामार्गावर वाहतूक वाढली आहे. दुचाकीस्वार, चारचाकी, तीनचाकी वाहाने सर्रास भरधाव वेगाने धावत आहेत. रस्ता झाल्याने वाहनचालकांचे वेग मर्यादेवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे (Sonpeth Accident) अपघातांच्या घटनात वाढ झाली आहे.दररोज छोटे मोठे अपघात होत आहे. विशेषत: मागच्या महिन्यात हा आकडा वाढला आहे. त्यामुळे या मार्गांवर तांड्याजवळ गतीरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.