हनुमान नगर तांड्याजवळील घटना
परभणी (Sonpeth accident) : सोनपेठ ते शेळगाव रोडवरील हनुमान नगर तांड्याजवळ चारचाकी कार भरधाव वेगाने जात असताना अचानक चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन, एक जण जखमी झाल्याची घटना आज दि. २० मार्च गुरुवार रोजी दुपारी ३:०० ते ३:३० च्या सुमारास घडली आहे.
परभणी ते सोनपेठ या (Sonpeth accident) महामार्गावर सतत अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे (Sonpeth accident) अपघात केंद्र बनले आहे. चारचाकी कार गाडी क्रमांक एम एच २२ ए.एम.९०६९ ही गाडी परभणी वरून सोनपेठ मार्गे बिडला भरधाव वेगाने जात असताना शेळगाव ते सोनपेठ रोडवरील हनुमान नगर तांड्याजवळ अचानक चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला आहे.
यामध्ये चालक मुकूंद नेमाने (वय ३७ वर्ष रा परभणी) हे जखमी झाले आहे.जखमींना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डाॅ. अमोल जंवाजाळ यांनी प्राथमिक उपचार करून किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगितले आहे. (Sonpeth accident) सोनपेठ ते शेळगाव या मार्गावर सतत अपघातांचे सत्र सुरू असुन, यामध्ये वर्षेभरात कित्येक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची जोर धरत आहे.