सोनपेठ (Sonpeth Cemetery) : परभणी/सोनपेठ धेनुनाईक तांडा व रेवा तांडा या दोन्ही ताड्यांला (Sonpeth Cemetery) स्मशानभूमी नसल्यामुळे धार डिघोळ रस्त्यावरील गायरान जमिनीवर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
राज्यातील प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने (Gram Panchayat) ग्रामपंचायतीच्या (Sonpeth Cemetery) स्मशानभूमीच्या बांधकाम व संरक्षण भिंती साठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु सोनपेठ तालुक्यातील डिघोळ गावच्या धेनुनाईक तांडा व रेवा तांडा या दोन्ही तांड्यांना अद्याप पर्यंत स्मशानभूमी नसल्यामुळे तांड्यावरील नागरिकांना सोनपेठ नगरपालिका घनकचरा प्रकल्पाच्या रस्त्यावरून धारडिघोळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गायरान जमिनीवर अंत्यविधी उरकला जातो. सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
तसेच एकाच ठिकाणी अंत्यविधी न करता रस्त्याच्या कडेने इतरत्र अनेक ठिकाणी अंत्यविधी केले जातात. धारडिघोळ कडे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास दिवसा जळत असलेले प्रेत पाहिल्यानंतर रात्री बे रात्री ये-जा करणाऱ्या नागरिक, महिला व शालेय मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Gram Panchayat) प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून संबंधित डिघोळ तांड्यावरील नागरीकांना रस्त्यावर अंत्यसंस्कार न करण्याची समज द्यावी व कुठल्यातरी एकाच ठिकाणी गायरानामध्ये त्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी (Sonpeth Cemetery) स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी धारडिघोळ येथील नागरिकांतून केली जात आहे.