सोनपेठ तालुक्यातील लोहीग्राम तांडा येथील घटना
परभणी (Sonpeth Crime Case) : सासु आणि साडुच्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी प्राशन केलेल्या एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर इसमाचा आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासु, साडु विरुध्द ५ नोव्हेंबर रोजी (Sonpeth Crime Case) सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण उमाजी पवार असे मयताचे नाव आहे. या बाबत मयताचे वडिल उमाजी पवार यांनी तक्रार दिली आहे. अरुण यांचे लग्न २० वर्षापूर्वी देवीनगर तांडा येथील युवतीसोबत झाले होते. तयताला चार आपत्य आहेत. मागील वर्षभरापासून मयताची पत्नी ही माहेरी देवीनगर तांडो येथे राहत होती. त्यामुळे अरुण हे तणावात होते. मयताची सासु आणि साडु हे दोघेजण मानसिक त्रास देत होते. त्यांच्याच त्रासाला कंटाळून २ नोव्हेंबरला मध्यरात्री अरुणने विषारी द्रव प्राशन केले. त्यांना उपचारासाठी सुरुवातीला अंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे छत्रपती संभाजी नगर येथे पाठविण्यात आले. मयताजवळ मिळालेल्या चिठ्ठीत सासु, साडुचे नाव पुढे आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सरुबाई राठोड, वैâलास वर्मा या दोघांवर (Sonpeth Crime Case) सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.