परभणीतील सायखेडा येथील घटना सोनपेठ ठाण्यात गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
परभणी/सोनपेठ (Sonpeth Crime) : अर्ध्या किंमतीत सोने मिळण्याचे अमिष एकाला चांगलेच महागात पडले आहे. आरोपींनी नकली सोने देत फिर्यादी जवळील अडीच लाख रुपये बळजबरीने हिसकावुन घेतले. ही (Sonpeth Crime) घटना सोनपेठ तालुक्यातील सायखेडा शेत शिवारात घडली. सदर प्रकरणी २३ डिसेंबरला सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गा काळे यांनी तक्रार दिली आहे. सप्टेंबर २०२४ या महिन्यामध्ये सदर फसवणुकीचा प्रकार घडला. आरोपींनी संगणमत करत फिर्यादीच्या पतीला फसवणुकीच्या उद्देशाने अर्ध्या किंमतीत सोने देतो असे अमिष दाखविले. त्यानंतर आरोपींनी सायखेडा येथील शेत शिवारात बोलाविले. या ठिकाणी नकली सोने दिले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी महिलेजवळील पर्स मधुन बळजबरीने अडीच लाख रुपये हिसकावुन घेतले. या (Sonpeth Crime) प्रकरणात तीन महिन्यानंतर २३ डिसेंबरला सोनपेठ पोलिस ठाण्यात जगदिश भोसले, बहादुर भोसले, ब्याज काळे, अकबर काळे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरील कारवाही (Sonpeth Crime) मा. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक पीडी भारती, राहुल परसोडे, लक्ष्मण कांगणे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, रंगनाथ दुधाटे सचिन भदर्गे ,हनुमान ढगे या पथकाने केली केली या घटनेच्या पुढील तपास सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोउपनि. किरण करत आहेत.