परभणी/सोनपेठ (Parbhani) :- मराठा आरक्षण मिळत नसल्याने एका तरुणाने विषारी द्रव (poisonous liquid) प्राशन केले. त्याला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरुणाचा मृत्यू (Death) झाला. मृतक तरुण हा सोनपेठ तालुक्यातील खडका येथील रहिवाशी आहे. याबाबत सोनपेठ पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद
श्रीहरी माधवराव मस्के (वय ३० वर्ष, रा. खडका) असे मृतकाचे नाव आहे. मयत हा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत मागणी सरकार का पूर्ण करत नाही या कारणावरुन ९ मार्च रोजी घरी कोणी नसताना विष पिले. ही बाब लक्षात आल्यावर श्रीहरी मस्के यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात (Private hospitals) दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान १० मार्च रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास युवकाचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी युवराज मस्के यांनी दिलेल्या खबरीवरुन सोनपेठ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ह. पवार करत आहेत.