परभणी/सोनपेठ (Sonpeth farmer) : तालुक्यातील शेळगाव वडगाव आवलगाव व सोनपेठ या चार (Board of Revenue) महसूल मंडळातील बळीराजाला (Sonpeth farmer) आता मृग नक्षत्र ३० दिवसावर येऊन ठेपला असल्याने शेतातील पाळी घालणे, पऱ्हाटी काढणे धसकटे वेचने पालवी तोडणे यांसह उन्हाळी मशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सोनपेठ तालुक्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील ढेकळं फुटून निघाले आहेत. त्यामुळे जमीनीत सुपिकता निर्माण झाल्यामुळे शेतातील पाळी घालणे, नांगरटी,मोगडा करणे, रुटर करणे हे कामे अतिशय सोपे झाले आहे.
कधी अवकाळी पाऊस, तर कधी उन्हाचा कडाका
कधी अवकाळी पाऊस, तर कधी उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे ४० च्या वर पारा गेला आहे. रखरखत्या उन्हात बळीराजाचा संपूर्ण परिवार अंगाची लाही लाही होत असताना देखील बळीराजा उन्हाळी मशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. सोनपेठ तालुक्यातील लासीना , वाघलगाव , दुधगाव, वाणीसंगम , सोनखेड , दहिखेड, निमगाव , थडीउक्कडगाव, नरवाडी, सायखेडा, शेळगाव, वडगाव , आवलगाव , वैतागवाडी, खपाट पिंपरी , शिर्शी, शिरोरी, खडका, भिसेगाव, सायखेडा या सह संपूर्ण तालुक्यातील (Sonpeth farmer) बळीराजा सकाळी लवकर उठून दहा वाजेपर्यंत पऱ्हाटी काढणे, उपटणे, कडबा गोळा करणे, शेणखत पांगविणे, शेतातील काडीकचरा वेचून व मशागतीची कामे करण्यास व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
मृग नक्षत्र 30 दिवसावर
सोनपेठ तालुक्यात ट्रॅक्टर द्वारे व लाकडी औताने मशागतीची कामे केली जात आहे. दुपारी उन्हाचे चटके बसत असल्याने (Sonpeth farmer) बळीराजा संपूर्ण परिवार सकाळी व सायंकाळी अधिक प्रमाणात मशागतीची कामे केली जात आहे. (Mrig Nakshatra) मृग नक्षत्र ३० दिवसांवर आल्याने मशागतीच्या कामाबरोबरच बि- बियाणे रासायनिक खते खरेदी करून ठेवण्यासाठी जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.