परभणी/सोनपेठ (Sonpeth Lighting) : सोनपेठ तालुक्यातील मौजे दुधगाव येथील शेतकरी शेतात बैलगाडी पेरणी करण्यासाठी घेऊन जात असताना (Sonpeth Lighting) विजेचा धक्का लागुन बैलजोडी जागीच ठार झाली तर शेतकरी बालाजी खरात हे गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. ऐण पेरणीच्या तोंडावर (Sonpeth farmer) बैलजोडी ठार झाले असून, अंदाजे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सोनपेठ तालुक्यात दुधगाव येथील घटना
सोनपेठ तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाट मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली होती. या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा जमिनीवर तुटून पडल्या होत्या.त्या तारामध्ये विज पुरवठा सुरू होता. त्यामध्ये तालुक्यातील मौजे दुधगाव येथील शेतकरी विष्णु खरात हे कुटुंबासह बैलगाडीने खरीपाची पेरणी करण्यासाठी जात होते. त्यांची बैलगाडी विजेच्या तारा वरुन जात असताना त्यांना विजेच्या जबर धक्का बसून बैलजोडी जागीच ठार झाली आहे.
बैलगाडीतील बालाजी खरात यांना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी सोनपेठ येथील (Sonpeth Hospital) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आसता डॉ. भरत चव्हाण यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ (Sonpeth Hospital) शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. ऐण खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर बैलजोडी ठार झाले असल्यामुळे जवळपास दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ तलाठी शाहुराज दिक्षित यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.