परभणी जिल्ह्यातील सोनपेठ च्या बुक्तरवाडी येथील घटना
परभणी/सोनपेठ (Sonpeth Murder case) : तालुक्यातील बुक्तरवाडी येथे शेत शिवारात जुना गुन्हा परत घेण्यासाठी पत्नीच्या तोंडात पदर कोंबुन विहिरीत ढकलून खून (Murder case) केल्याची घटना रविवार १५ सप्टेंबर रोजी घडली असून या प्रकरणी सोनपेठ पोलीस (Sonpeth Police) स्थानकात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या विषयी अधिक महिती अशी की, मयत छायाबाई महादेव देवकते यांनी व त्यांचे पती महादेव देवकते गतवर्षी लिंबा येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. त्यावेळस पती विरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मिटवून घे म्हणण्याच्या कारणावरून शनिवारी किरकोळ बाचाबाची व मारहाण झाली. रागाच्या भरात पती महादेव देवकते व ऋषिकेश जोडतले यांनी महिलेला तोंडात पदर कोंबून विहिरीत ढकलून दिले. त्यामुळे त्यांचा मृत्यू (Murder case) झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोनि सुर्यमोहन बोलमवाड, पोउपनि नंदकिशोर कांबळे, कुलकर्णी, लटपटे, रासवे यांनी घटनास्थळी भेट दिली. मयताच्या मुलीच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास (Sonpeth Police) पोउपनि नंदकिशोर कांबळे करत आहेत.