सोनपेठ पोलीस ठाण्यातील परिस्थिती
परभणी/सोनपेठ (Sonpeth police) : पोलीस ठाण्यातील अपुरे कर्मचारी आणि वाढत असलेले गुन्हे यामुळे कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला आहे. (Sonpeth police) पोलिसांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी संख्येकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, खडका, सोनपेठ, नरवाडी, उखळी, महातपुरी या सहा बीट केंद्रांतर्गत तालुक्यातील 62 गावांसह गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, धारासुर, सावंगी, गौंडगाव, भांबरवाडी, मानकादेवी, शंकरवाडी यासह 20 गावे, असे एकूण 91 गावांचा समावेश (Sonpeth police) सोनपेठ पोलीस ठाणे हद्दित येतो. या गावांचा कारभार केवळ 24 पोलीस कर्मचार्यांवर सुरू आहे. या दोन्ही तालुक्यातील लोकसंख्येच्या तुलनेत किमान 60 ते 65 पोलीस कर्मचारी अपेक्षित आहेत.
अपुर्या कर्मचार्यांमुळे कामाचा ताण
मात्र 24 कर्मचारीच उपलब्ध आहेत. त्यातील 2 कर्मचारी सोनपेठ न्यायालयात, 1 कर्मचारी सत्र न्यायालयात तर 2 चालक आहेत. 19 पोलीस कर्मचार्यांवरच सर्व भिस्त आहे. एखाद्या गंभीर घटनेचा तपास करताना अपुर्या कर्मचार्यांमुळे मोठी कसरत करावी लागत आहे. गुन्ह्यांबरोबर विविध आंदोलन, मोर्चे, उपोषण, सभा, जयंती, सण उत्सव अशा वेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. याचा परिणाम तपासावर होत आहे. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही (Sonpeth police) पोलिसांना काम करावे लागत आहे. त्यात सोनपेठ पोलीस ठाण्यापासून काही गावे 50 ते 55 किमी अंतरावर आहेत. त्यामुळे या गावांपर्यंत पोहोचण्यासही मोठा वेळ लागत आहे.