शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी
नागपूर (soybean crops) : नागपूर ग्रामीण तालुक्यातील सोनेगाव (लोधी) येथील शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन पीक (soybean crops) लवकरात लवकर बहरावे तसेच शेतात तण वाढून पिकाची वाढ खुंटू नये व पिकावर कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुसोव्हा कंपनीचे क्युरॉन नावाच्या औषधाची फवारणी केली. परंतु या औषधाच्या फवारणी नंतर सोयाबीन पीक बहारण्या ऐवजी संपूर्ण पीक करपून जळाले असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने तें रडकुंडीला आले आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात,पण निसर्गाची अवकृपा सातत्याने होत असल्याने पदरी निराशाच येत आहे.आधीच अस्मानी, सुलतानी संकटाने बेजार असलेला शेतकरी कशी तरी कंबर कसून शेती करायला तयार होतो त्यात शेतातील उभे पीक करपल्याने दारिद्राच्या दृष्टचक्रात झाल्याची स्थिती या शेतकऱ्यांची आहे.
सोयाबीन करपले, शेतकरी रडकुंडले
सोनेगाव (लोधी) येथील शेतकरी हंसराज सुरकर, रामदास झाडें,जगन्नाथ दहीहंडे, सुरज अवचट,कवडू ढगे व समीर देशपांडे यांनी खरीपाच्या हंगामात मोठ्या उत्साहात आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे संपूर्ण शेतशिवार नवीन नवरीने अंगावर हिरवा शालू परिधान केल्यागत हिरवगार झालं होत.त्यामुळे शेतकरी सुखवले होते. शेतातील दौलदार पीक (soybean crops) बघून आनंदाने हर्षुन गेले होते. मात्र न जाणे त्यांना कुणाची नजर लागली, आपल्या शेतातील पिकावर तणाचा व कुठल्याही रोगाचा प्रादुर्भावं होऊ नये म्हणून त्यांनी गावातच असलेल्या श्रीजीत एग्रो एजन्सी मधून दि ४ ते ६ जुलै दरम्यान तुसोव्हा कंपनीचे क्युरॉन नावाचे औषधी घेऊन पिकावर फवाराणी केली असता वरील सर्वच शेतकऱ्यांच्या एकूण ३५ एकर शेतातील सोयाबीन पीक करपून/जळून नष्ट झाले.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, शेतकऱ्यांचा वाली कोण?
शेतातील लाखो रुपयांचे (soybean crops) पीक औषधाच्या फवारणीने करपून गेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना शेताची पाहणी करून झालेली नुकसान भरपाई देण्याकरिता दि १९ जुलै ला अर्ज केला. त्यानुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी नागपूर दिपाली कुंभार, मंडळ अधिकारी युवराज चौधरी, तालुका कृषी अधिकारी मनीषा घेरे, नागपूर पंचायत समिती कृषी अधिकारी शुभांगी कामडी, नागपूर कृषी महाविदलायचे डॉ विनोद खडसे, बुटीबोरी कृषी पर्यवेक्षक लता टोगगलवार,सोनेगाव लोधी विभागाचे कृषी सहाय्यक आशिष झाडें,क्युरॉन उत्पादन करणाऱ्या तुसोव्हा कंपनीचे प्रतिनिधी विनोद झोडे व श्रीजीत एग्रो एजन्सी चे संचालक सचिन वाटमोडे आदिजन शेतात येऊन पिकाची पाहणी केली. शेताची पाहणी करून आज जवळपास महिना उलटून गेला परंतु आजपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ना औषधं उत्पादक कंपनी किंवा शासनकडून कवडीचीही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी रामदास झाडें यांनी उपस्थित केला. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी मनीषा घेरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
औषधाचे सॅपल घेऊन प्रयोगशाळेला पाठविले
सोनेगाव (लोधी) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक (soybean crops) करपल्याची तक्रार मिळाल्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत मी कृषी सहाय्यक म्हणून शेताची पाहणी केली. शेतातील पीक संपूर्ण करपले असून शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे क्युरॉन या औषधाच्या फवाराणीने पीक करपले म्हणून औषधाचे सॅम्पल प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविले आहे. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नाही.
– आशिष झाडें, कृषी सहाय्यक
नुकसान भरपाई द्यावी
यावर्षी एकूण ९ एकरात सोयाबीनचा पेरा (soybean crops) केला होता. पावसामुळे पीक सुद्धा चांगले होते. शेतात जास्त तण होऊ नये म्हणून शेतात तुसोव्हा नामक कंपनीच्या क्युरॉन औषधीची फावाराणी केली असता संपूर्ण शेतातील पीक करपूण लाखो रुपयाचे नुकसान झाले.गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पीक सुद्धा करपले असून सर्वांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.
– रामदास झाडें,शेतकरी, सोनेगाव (लोधी)
या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी क्युरॉन या औषधाची फवारणी केली आहे. त्यापैकी काहीच लोकांच्या शेतातील पीक करपली. परंतु (soybean crops) पीक करपण्यामागे विविध कारणे असू शकतात. कृषी अधिकाऱ्यांनी औषधाचे सॅम्पल तपासणी करिता नेले आहे. अहवाल आल्यावर सत्य आपल्या समोर असेल.
– विनोद झोडे, कंपनी प्रतिनिधी,तुसोव्हा