देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Soybean farmers) : गेल्या आठ दिवसा पासून सततधार पाऊस पडत आहे आणि त्यातच (Rohi animals) रोही जनावरे उभ्या पिकामध्ये धुमाकूळ करूण पिके उध्दवस्त करूण टाकत आहे . त्यामुळे पिकांचे नुकसान पाहून (Soybean farmers) सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदील होवून गेला आहे. चिखली तालुक्यातील मेरा बु महसूल मंडळात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मृग नक्षत्रात उशिरा पाऊस पडल्याने शेत शिवारातील पेरण्या विस्कळित होवुन काही शेतात विलंबाने पेरण्या झाल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.
रोही जनावरांमुळे सोयाबीन पिके उध्दवस्त
तर काही शेत शिवारात सुरवातीच्या पेरण्यामुळे (Soybean farmers) सोयाबीन पिकाची चांगली वाढ होवून पिके हिरवीगार व टवटवीत दिसायला लागली . पिके चांगली पाहायला मिळत असल्याने शेतकरी सोयाबिन पिकावर खत, औषधी, निदन खुरपणी, कोळपणी करण्यासाठीं मोठा खर्च करू लागला आहे. मात्र दिवसंदिवस पिकाचे वाढ होत चालली असतांना शेकडो रोही जनावरे (Rohi animals) पिकामध्ये धुमाकूळ घालून पिकाचे अतोनात नुकसान करूण टाकत आहे. शेतकरी पिकाचे रक्षण करण्यासाठी पावसामध्ये व रात्रीच्या अंधारात जिवाची पर्वा न करता शेतात जावून रोही हाकलुन लावत आहे.
परंतु रोही जनावरे शेतात हाकलुन लावताच काही वेळातच पुन्हा शेतात येवून पिकाचे नुकसान करत आहे या त्रासापायी (Soybean farmers) सोयाबिन उत्पादक शेतकरी हवालदील होवून गेले आहे. या (Rohi animals) रोही जनावरामुळे झालेल्या पिकाचे नुकसान बाबतीत शेतकरी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे जावून न्याय मागतो. मात्र कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याने शेतकऱ्यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेवून (Rohi animals) रोही जनावरांचा बंदोबस्त करावा अथवा शेतकऱ्यांना पिकाच्या रक्षणासाठी शासकिय अनुदान द्यावे जेणे करून शेतकऱ्यांच्या शेतातील पीक वाचेल आणि उत्पन्नात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांची ओरड होत आहे.