Arni :- मागील वर्षी पासून खाद्य तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहे. एकीकडे शेतकर्यांच्या सोयाबीनचे भाव ३ हजार ते साडेतीन हजार रुपये राहिले आहे अशा परिस्थितीत मात्र सोयाबीन (soybeans)खाद्यतेल १४० रुपये प्रति किलो प्रमाणे विकल्या जात आहे.
खाद्यतेल उत्पादक कंपन्या मालामाल
वास्तविक पाहता सोयाबीन चे भाव कमी झाले असताना खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्यापेक्षा उलट वाढतीवर आहे. मागील वर्षी सुद्धा सोयाबीन ४ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होते तर सोयाबीन तेल १२० ते १४० रुपये प्रति किलो विकले जात होते. यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटले असताना सुद्धा भावात ओलावा असल्याचे कारण समोर करून व्यापारी ३ हजारापासून खरेदी करीत आहेत. एकीकडे केंद्र शासनाने हमीभावाचा गवगवा केला असताना हमी भावाचा फायदा व्यापार्यांना जास्त होत आहे कारण शासकीय खरेदी अद्याप सुरू न झाल्यामुळे शेतकर्यांना सण उत्सवाच्या काळात सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार(Agricultural produce market) समितीत विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मागील दहा वर्षा आधी सोयाबीनला जे भाव होते त्या भावाने सोयाबीन खरेदी केल्या जात आहे तर खाद्यतेलाच्या किंमती मात्र दुप्पट तिपटीने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाने खाद्यतेलाच्या किंमतीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे कारण गोरगरिबांना खाद्यतेलाच्या किती वाढल्यामुळे झळा बसत आहे.