चिखली (बुलढाणा) :- रात्रीचा गैरफायदा घेवुन अज्ञात व्यक्तीने शेतातील सोयाबिन सूडी पेटून दीलीवानी लाखोंचे नुकसान केले. महसूल विभागाला (Department of Revenue) या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा केला.
माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा
अंढेरा पोलीस स्टेशन (Police Srtation) अंतर्गत येणाऱ्या इसरुळ येथील पांडुरंग विश्वास भुतेकर यांचे गावालगत शेत आहे. त्यांनी शेतातील सोयाबीनची सोंगणी करूण शेतात मोठीं सुडी घातली होती. आणि काही दिवसातच सोयाबीनची सूडी मळणी यंत्राद्वारे काढूण घेणार होते परंतु अचानक ६ ऑक्टोबर रोजी रात्रीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सोयाबिन सुडी पेटविल्याचे दिसुन आले. त्यावेळी गावकऱ्यांनी सुडी विझविण्याचा प्रयत्न केला मात्र कांहीही उपयोग झाला नाही आणि संपूर्ण सुडी जळून खाक झाली. एकमेव सोयाबिन (Soybean) पिक होते आणि तेही जाळून या आकले त्यामूळे शेतकरी ठसा ठसा रडायला लागला. या घटनेची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला लागताच लगेच घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा केला असून ठाणेदार विकास पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की सर्वांनी आपल्या सोयाबिन मालावर लक्ष ठेवावे, काही संशयित प्रकार दिसुन आल्यास तात्काळ बिट जमादार व थेट ठाणेदार यांच्याशी संपर्क करावा. ज्या अनोळखी व्यक्तीने सुडी पेटवून नुकसान केले त्यांचा लवकरच तपास करून बेड्या ठोकल्या जातील असे सांगण्यात आले.