कळमनुरी/हिंगोली (Uddhav Thackeray) : हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महायुती सरकारने नेहमीच सोयाबीन उत्पादकांकडे दुर्लक्ष केले. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनवर प्रक्रिया करणारा मोठा उद्योग पुढील काळात उभारला जाईल, असे आश्वासन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कळमनुरीत बोलतांना दिले.
विधानसभा निवडणुकीसाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. संतोष टारफे, हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रूपालीताई गोरेगावकर, वसमत विधानसभेचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ ९ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा कळमनुरी येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाली की आपण अडीच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राला कसे पुढे जावे यासाठी प्रयत्न करत होतो; परंतु दुर्दैवाने आपले सरकार गेले. यानंतर महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या मालाला मिळाला नाही अनेक विकास कामे टक्केवारीमुळे रखडल्या गेली.
परंतु येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा हा विकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम राबविणार असून शेतकऱ्यांच्या मालाला उ चांगला हमीभाव देणार असून हिंगोली जिल्ह्यासाठी सोयाबीनचा प्रकल्प व उभारण्यात येईल तसेच सिंचनाचा प्रश्नही त मार्गी लावण्याचे आश्वासन सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. याच घ बरोबर महिलांना ३००० रुपये महिना देणार असून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना व रोजगार मिळेपर्यंत ४००० रुपयांचे घ अनुदानही देणार आहेत तसेच शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांची कर्जमाफी सत्तेत 3 आल्यानंतर करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी बोलताना सांगितले की, उर्फ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनेक मुद्यांवर हात घालून विरोधकांवर सडकून टीका केली.
यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख अजय सावंत, गोपू पाटील, संदेश देशमुख, विनायक भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे पवार जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, माजी खासदार शिवाजी माने, शिवसेनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल, वसीम देशमुख, अयोध्या पोळ, डॉ. रमेश मस्के, अब्दुल्ला पठाण, मुखीद आश्रफी, दिलीप घुगे, संतोष सारडा, सखाराम उबाळे,डॉ. सतीश पाचपुते. प्रशांत बोडखे, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रकांत देशमुख, बाळु पारवे, अँड. गुणानंद पतंगे आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गद्दारीवर नांगर फिरविण्यासाठी आलो
नवीन पीक घेण्याआधी जसे शेतात नांगरडी करतात, तशी नांगरडी करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे, लोकसभेत या आधीच हिंगोली जिल्ह्याने गद्दारांना शिक्षा दिली आहे, आता विधानसभेतही आपल्याला गद्दारीवर नांगर फिरवायचा आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. यापूर्वी त्याला उमेदवारी देणे ही माझी चूक होती व मी तुमची माफी मागतो असा हल्लाबोल आमदार संतोष बांगर यांचे न नाव घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.