• शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणन विभागाचे आवाहन
• जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र निश्चित
• 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आर्द्रता असलेला व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा
हिंगोली (Soybean Purchase) : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम 2024-25 मध्ये मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून, या खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी दि. 1 ऑक्टोबर, 2024 पासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. तसेच याच खरेदी केंद्रावर दि. 07 जानेवारी, 2025 पर्यंत मूग व उडीद खरेदी तर दि. 12 जानेवारी, 2025 पर्यंत सोयाबीन खरेदी (Soybean Purchase) सुरु करण्यात येणार आहे.
मूग, उडीद, सोयाबीन खरेदी (Soybean Purchase) करण्यासाठी जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कयाधु शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी ही संस्थेचे खरेदी केंद्र वारंगा फाटा व कळमनुरी येथे आहेत. वारंगा फाटा येथील केंद्रावर केंद्र चालक म्हणून मारोती शिवदास कदम (संपर्क 9736449393) तर कळमनुरी येथील केंद्रावर प्रशांत तुकाराम मस्के (9921609393) हे आहेत.
हजरत नासरगंज बाबा स्वयंसेवी सेवा सहकारी संस्था म. हिंगोली या संस्थेचे खरेदी केंद्र येहळेगाव ता. औंढा नागनाथ येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून शेख गफार शेख अली हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9881501040 असा आहे. प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था,हिंगोली या संसथेचे खरेदी केंद्र बळसोंड जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून नारायण शामराव भिसे हे कामकाज पाहणार असून 9850792784 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
औंढा नागनाथ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या संस्थेचे खरेदी केंद्र जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे आहे. या संस्थेवर केंद्र चालक म्हणून कृष्णा नामदेव हरणे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 9175586758 असा आहे. श्री संत नामदेव स्वयंरोजगार सहकारी संस्था म. चोरजवळा या संस्थेचे खरेदी केंद्र कन्हेरगाव ता. जि. हिंगोली येथे आहे. या संस्थेवर केंद्रचालक म्हणून अमोल जयाजीराव काकडे हे कामकाज पाहणार असून त्यांचा संपर्क क्र. 8007386143 आहे.
विजयलक्ष्मी बेरोजगार सहकारी संस्था म. कोळसा ता. सेनगाव या संस्थेचे खरेदी केंद्र साखरा ता. सेनगाव येथे आहे. या (Soybean Purchase) केंदावर केंद्र चालक म्हणून उमाशंकर वैजनाथ माळोदे हे काम पाहणार आहेत. त्यांना 9403651743 क्रमांकावर संपर्क साधावा. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या संस्थेचे खरेदी केंद्र सेनगाव येथे आहे. या केंद्राचे केंद्र चालक म्हणून निलेश रावजीराव पाटील (9881162222) हे असून, वसमत तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, वसमत या संस्थेचे खरेदी केंद्र वसमत येथे आहे.
या केंद्रावर केंद्र चालक म्हणून सागर प्रभाकर इंगोले हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 8390995294 असा आहे. गोदावरी व्हॅली फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. शिवणी खु. ता. कळमनुरी येथे आहे. या केंद्रावर केंद्र चालक म्हणून कैलास सुभाष ढोकणे हे काम पाहणार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक 7447758312 असा आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. तसेच 12 टक्के मॉइश्चर पेक्षा कमी आर्द्रता असलेला व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी (Soybean Purchase) केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.