– सतिश मल्लाडे
शिरूर अनंतपाळ (Soybeans Farmers) : शिरूर अनंतपाळ तालुक्यात सततच्या पावसामुळे (Soybeans Farmers) सोयाबीन पिकात पाणी साचून राहिल्याने शेंगांना कोंब फुटले आहेत. पावसाची उघडीप मिळत नसल्याने सोयाबीन काढणी खोळंबल्या आहेत. सतत दुष्कळच्या छायेत असणारा या भागातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. तालुक्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून सतत चार महिने पावसाने उसंत घेतली नाही.
त्यामुळे या भागात खरिपाच्या ९० टक्के पेरण्या झाल्या. झालेल्या आहेत. पेरण्यातील मूग, उडीद, ही पिके तर अतिपावसाने कुजून वाया गेली आहेत. अजूनही पाऊस सुरुच आहे.त्यामुळे आता काढणीला आलेल्या (Soybeans Farmers) सोयाबीन पिकाला पावसाचे पाणी जमिनीत साचल्यामुळे जागेवरच कोंब फुटत आहेत. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. कायम दुष्काळाच्या छायेत असणारा शिरूर अनंतपाळ तालुका यंदा ओल्या दुष्काळत सापडला आहे. खरीप पिके वाया गेली आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडून पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
अद्याप पाऊस थंबला नसल्याने, मुसळधार व सततच्या पावसामुळे या भागातील ओढे-नाले, तलाव, नदी दुथडी भरुन वाहू लागली आहेत. पावसाने अद्यापही उसंत घेतली नसून, रोज दुपारनंतर पाऊस हजेरी लावत असल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. या परिसरात सोयाबीन पीक काढणीला आलेले असून, पावसामुळे काढता येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. जमिनीतील पाणी काढणे अशक्य झाले आहे. रानात चिखल असल्यामुळे मजुरांना (Soybeans Farmers) सोयाबीन काढता येत नाही. त्यामुळे सोयाबीन काढणीला आवश्यक वातावरण नसल्यामुळे विलंब होत आहे. याचा परिणाम हंगामावर झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी झाली आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सध्या सोयाबीन (Soybeans Farmers) काढणीचा हंगाम सुरू असून अगोदरच मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. आता त्यातच काढणीसाठी आलेले सोयाबीन सतत पाऊस पडत असल्याने, काढणे खूप अवघड झाले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचले असून, सोयाबीन काढता येत नाही. त्यामुळे आता उभ्या पिकाला कोंब फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– अविनाश बिरादार, शेतकरी