अखंड मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
लातूर (Akhand Maratha Samaj) : आडत बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीनची सर्रास खरेदी केली जात असून ती तात्काळ थांबवावी. हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केली तर सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयात आणून टाकू, असा इशारा (Akhand Maratha Samaj) अखंड मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला. शासनाने घोषित केलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीनची खरेदी करावी तसेच गतवर्षीचा पीकविमा तात्काळ द्यावा, या मागणीसह एकूण पाच मागण्यांसाठी अखंड मराठा समाजाच्यावतीने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
गेल्या वर्षी लातूर व रेणापूर हे दोन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले होते, त्याचे अनुदान तात्काळ द्यावे. ठिबक, तुषार सिंचनाशी निगडित तसेच संलग्न अवजारे याचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे. अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशा मागण्या या (Akhand Maratha Samaj) निवेदनात शिष्टमंडळाने केल्या. या निवेदनावर प्राध्यापक विकास कदम, गजानन सोळंके, हरिभाऊ घाडगे, दिनेश पानढवळे, दत्तात्रय जाधव, गजानन पाटील, संजय मस्के, आकाश सावंत, सुमित धावारे, सागर कांबळे, नारायण मुळे, अरुण पवार, विष्णुदास काळे, अनंत होळकर, राजाभाऊ मोरे व धनराज धुमाळ आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.