हजारो क्विंटल माल बाजारपेठेत पडुन
परभणी/पूर्णा (Soybeans price) : मागील काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्यामुळे पूर्णा बाजार समितीच्या आवारामध्ये सोयाबीनचे ढीगच्या ढीग दिसत आहे. चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी सोयाबीन बाजारपेठेत आणण्यास धजत नाहीत शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. एकीकडे हमीभाव दरापेक्षाही कमी भावाने सोयाबीन बाजारपेठेत विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी (Soybeans price) सोयाबीन विक्री करण्यास चक्क नकार दिला आहे. परिणामी व्यापारी व शेतकऱ्यांचे व्यवसायाचे गणित बिघडले आहे.
अवकाळी पाऊसामुळे व्यापारी व शेतकऱ्याची एकच तारांबळ
पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करीत असताना तीन ते चार महिन्यांमध्ये नगदी पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. सोयाबीनची पेरणी केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये हे पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडते व त्यामधून आगामी आठ महिन्यांचा आर्थिक ताळेबंद शेतकरी या सोयाबीन पिकांवर करतो.
परंतु मागील काही दिवसांपासून (Soybeans price) सोयाबीनला बाजारपेठेत भावच नाही. भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी भाव वाढेल या आशेत जगत आहे . मागील दसरा, दिवाळी सणापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली नाही.मध्यतंरी निवडणुकीच्या कालावधीत बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणले गेले नाही जशा निवडणुका संपल्या तसे थोडे थोडे सोयाबीन बाजारपेठेत येऊ लागले आहे , शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्यामुळे काहीजण सोयाबीन बाजारपेठेत आणत आहेत..भाववाढीची वाट तरी किती पाहाणार?
त्यामुळे पूर्णा बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात आडत व्यापाऱ्यांच्या आडतीसमोर सोयाबीनचे ढीग दिसून येत आहेत. एकंदरितच बाजारभाव
४ हजार २०० ते ३०० च्या वर जायला तयार नाही तर आज ना उद्या भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तसेच ठेवले आहे. दुसरीकडे सोयाबीनवर शेतकऱ्यांनी अगोदरच उचल घेतलेली राहते, त्या उचलीची परतफेड करणे व नवीन ताळेबंद बसविणे यामध्ये बळीराजा मात्र गुंतलेला दिसतो. परंतु यावर्षी बाजारपेठेत सोयाबीनचे दर पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे
हमीभावासाठी नोंदणी एकीकडे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात (Soybeans price) सोयाबीनचे दर कोसळले आहेत. परंतु हे गडगडलेले दर शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असून, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सध्या हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. हे विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रथम ऑनलाईन नोंदणी करून घेतली जात आहे ..त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे.
पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत खरेदी- विक्री संघाच्या २ हजार ७०० शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नाव नोंदणी केली आहे, अशी माहिती पूर्णा तालुका खरेदी- विक्री संघाचे सचिव नितीन देसाई यानीं देशौन्नती शी बोलाताना सांगितले.
पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास ६० ते ७० अधिकृत व्यापारी दरवर्षी शेतकऱ्यांकडे (Soybeans price) सोयाबीन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावर्षी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग आहे; परंतु मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली नाही. शेतकर्यानीं सोयाबीन बाजारपेठेत विक्री केल्यानंतर पक्की हिशोब पट्टी ध्यावी जेणेकरून भविष्यात शासनाकडून काही अनुदान जाहीर झाले तर ते शेतकऱ्यांना मिळण्यास अडचण येणार नाही.
भाव नसल्यामुळे पूर्णा बाजारपेठेमध्ये जवळपास ३५ हजार कट्टे सोयाबीनची आवक पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत आला असल्याची माहिती आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश मोदाणी यांनी दिली.
आजच्या सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसा मुळे शेतकऱ्यांकडून उघड्यावर ठेवलेल्या (Soybeans price) सोयाबीन पोत्यावर झाकण्यासाठी बाजारपेठेत शेतकरी व व्यापारी याचीं एकच तारांबळ उडालेली दिसत होती मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत दाखल केलेले सोयाबीन निम पडले होते व त्यात आज झालेल्या पावसामुळे तर खूप नुकसान झाल्याचे कळते.